Friday, May 17, 2013

Marathi Ukhane 2019 for Bride/Vadhu /navari/ navari mulagi (मराठी उखाणे (वधूसाठी / नवरीसाठी) )

उखाणे आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या....५०० पेक्षा अधिक उखाण्यांचा संग्रहातून खास २०१३ च्या लग्नसराई साठी काही निवडक उखाणे,
यापुढेही मी माझ्या फेस्बूक, ट्विटर प्रोफालीवर ताजे उखाणे पोस्ट करेन -निसर्ग हांडे

1.कॉलेज मधे असतानाच ---रावांनी मला हेरल
शिक्षण संपल्या बरोबर त्यानी मला वरल

2.मुळामुठेच्या संगमावर वसले सुंदर पुणे
---रावांच्या संसारात नाही कशाचे उणे

3.चकोराला असते चांदण्याची आस
---रावांना देते ---चा घास

4.इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर
---रावांचे नाव घेते सोडा पदर

5.नंदनवनात फुलली सोन्याची कमळे
---रावांच्या मुळे मला संसाराचा अर्थ कळे

6.सह्याद्री पर्वतावर मोरांनी फोडला टाहो
---रावांचे नाव नेहमी माझ्या ओठांवर राहो

7.मिठाचा सत्याग्रहा झाला समुद्राकाठी
---रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

8.भाऊ माझा दादा, बहीण माझी ताई
---रावांच्यासाठी सोडली प्रेमाची आई

9.लग्ना प्रसंगी लोक करतात आहेर
---रावांसाठी सोडले आई वडील माहेर

10.गुलाबाचे झाड फुलांनी वाकले
---रावांसाठी सासरी पाऊल टाकले

11.हाताने करावे राम मुखाणे म्हणावे राम
---रावांचे चरण हेच माझे चारही धाम

12.कुबेरच्या भंडारात हिरे माणकाच्या राशी
---रावांचे नाव हीच माझी आयोध्या काशी

13.काचेच्या पेल्यात सुख दुखाचे पेय
---रावांना किर्ती मिळावी हेच माझे धेय

14.आता वाजले 10/6
---राव म्हणतात माझ्याकडे एकदा तरी पहा

15.सासूबाई आहेत प्रेमळ,सासरे आहेत दयाळू
---राव तर आहेत अतिशय मयळू


तुमच्या कडील चांगले उखाणे Whatsapp करा  9960414645

No comments:

Post a Comment